नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहने

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहने
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देशात प्रथमच व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर केला जाणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. यासोबतच गाईडला इंग्रजी भाषा, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हॉटेल, रिसॉर्टमध्ये ५० टक्के संधी दिली जाणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.२३) पार पडली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्या दृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताडोबा-अंधारी या प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतेवेळी वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे ८२ गावे असून त्यापैकी ६२ गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसित संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक, स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रिया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल, यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

 उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान ५० टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा तसेच बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी, अशा सुचानाही त्यांनी दिल्या. याबरोबरच  विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलच्या संपूर्ण माहितीबाबत गाईडला  विशेष प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news