Nagpur Pharmaceutical Fraud | बनावट लेबल लावून औषधांचा स्वीडनला पुरवठा? नागपूरच्या फार्मा कंपनीविरुद्ध गुन्हा

FDA ची कारवाई; बनावट गुणवत्ता प्रमाणपत्रे, बनावट लेबल्स आढळल्याचा आरोप, २ हजार बॅचेस बॅक्टेरिओस्टॅटिक वॉटर जप्त
Fake Label Medicine Sweden Drug Export
Fake Label Medicine Nagpur Pudhari
Published on
Updated on

Fake Label Medicine Sweden Drug Export

नागपूर : स्वीडनमधील ग्राहकाला संशयित बनावट औषधांचा पुरवठा केल्याचा आरोप झाल्यानंतर नागपूरस्थित M/s Skyline Impex या औषध कंपनीच्या भागीदारांसह कथित पुरवठादार आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुन्हा दाखल केला आहे. बनावट लेबल्स आणि बनावट गुणवत्ता प्रमाणपत्रांच्या आधारे ‘रिसर्च पेप्टाइड्स’चा पुरवठा केल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे औषध व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

FDA औषध निरीक्षक स्वाती सुधाकर भारदे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, स्वीडनमधील ग्राहक टॉमी ब्लॉमक्विस्ट यांनी IndiaMART या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून Skyline Impex कडून MOTS-c आणि इतर ‘रिसर्च पेप्टाइड्स’ खरेदी केल्याचे नमूद आहे.

Fake Label Medicine Sweden Drug Export
Nagpur Crime | नागपुरात खळबळ : आमदार निवासाजवळ तरुणाचा धारदार शस्त्राने खून

प्रयोगशाळेच्या तपासणीत सक्रिय घटक आढळला नसल्याचा दावा

खरेदी केलेल्या उत्पादनाच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये कोणताही सक्रिय औषधी घटक आढळला नसल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या उत्पादनांवर अमेरिकेतील Peptide Sciences या कंपनीशी संबंधित ब्रँडिंगचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित अमेरिकन कंपनीने उत्पादनांवरील लेबल आणि आर्टवर्क बनावट असल्याचे कळविल्याचे तपासात समोर आल्याचे FDA ने म्हटले आहे.

संगणकातून बनावट CoA आणि लेबल्सचा साठा

२५ जून रोजी FDA अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी केली असता संगणक प्रणालीमध्ये बनावट Certificate of Analysis (CoA) तसेच बनावट उत्पादन-लेबलचे आर्टवर्क आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित लेबल्सवर QR कोडही छापण्यात आले होते. हे QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित विदेशी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाकडे वळत असल्याचे तपासात आढळले. त्यामुळे उत्पादन खरे असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

Fake Label Medicine Sweden Drug Export
Nagpur Crime : ई-रिक्षा चोरीचा तपास करताना वाहनचोर जाळ्यात; ५ लाखांची सहा वाहने जप्त

२ हजार बॅक्टेरिओस्टॅटिक वॉटरच्या बाटल्या जप्त

FDA च्या तपासणीत ‘For Export Only’ असे नमूद असलेल्या ‘Bacteriostatic Water for Injection’च्या सुमारे २ हजार बाटल्या आढळल्या. त्यातील दोन बॅचचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या नमुन्यांना ‘Not of Standard Quality’ घोषित करण्यात आले. बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन, pH आणि पार्टिक्युलेट मॅटरशी संबंधित चाचण्यांमध्ये नमुने अपयशी ठरल्याचे तपासात समोर आले.

नागपूरच्या भागीदारासह पंजाबमधील कथित पुरवठादारावर गुन्हा

या प्रकरणात जरीपटका येथील रहिवासी आणि Skyline Impexचा भागीदार यश सेवेंद्र बेरी, पंजाबमधील झिरकपूर येथील कथित पुरवठादार मनहिर सिंग, कथित उत्पादक M/s Dr Glexx Pharmakem तसेच काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(3), 338, 340(2), 276, 277, 278, 61(2) आणि 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, स्वीडनला पाठविण्यात आलेल्या कथित औषधांच्या खेपेसंदर्भात कमी किंमत दाखविणे (under-invoicing) आणि शिपिंग कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचाही तपास यंत्रणेला संशय आहे.

Fake Label Medicine Sweden Drug Export
Nagpur Corporator Firing Case | ५०० सीसीटीव्हींच्या तपासातून नगरसेवकाच्या घरावरील गोळीबाराचा छडा

Skyline Impexचा औषध परवाना रद्द

प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर FDA ने Skyline Impexचे घाऊक औषध विक्री परवाने रद्द केले आहेत. बनावट लेबलिंग, गुणवत्ता प्रमाणपत्रांमध्ये कथित फेरफार, औषधांचा पुरवठा आणि निर्यात कागदपत्रांशी संबंधित बाबींचा पोलिस आणि FDA कडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news