Nagpur Crime | नागपुरात खळबळ : आमदार निवासाजवळ तरुणाचा धारदार शस्त्राने खून

सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Youth Murder Nagpur

नागपूर : सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमदार निवासाजवळील एका गल्लीत २५ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मृत युवकाचे नाव आकाश सुरेश नेवारे (२५, रा. तेलंगखेडी, अंबाझरी) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजल्यानंतर आकाशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Crime News
Nagpur crime: जिवंत डिटोनेटर घेऊन पोहोचला नागपुरात; वरोरा येथून आलेल्या युवकाला लकडगंज पोलिसांची अटक

घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आकाश नेवारे याची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Crime News
Nagpur Crime : शासकीय सुधारगृहातून ४ अल्पवयीन आरोपी पसार

हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आकाश घटनास्थळी कोणासोबत आला होता, तो तेथे कशासाठी गेला होता आणि त्याच्यावर हल्ला करणारे कोण होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथकेही सक्रिय झाली आहेत.

आकाशचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि शरीरावरील जखमांची अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news