

Six corona infected patients reported in Nagpur; Doctors say no serious symptoms
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी ते मे महिन्यापर्यंत नागपुरात सहा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 3 रुग्ण मे महिन्यातील आहेत. परंतु कोणालाच गंभीर लक्षण नसल्याने आणि रुग्णांची संख्याही मोठी नसल्याने चिंता करण्याची गरज नाही मात्र काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
सध्या देशभरात 257 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर नागपुरात आतापर्यंत सहा रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील जानेवारीमध्ये 1, एप्रिलमध्ये 2 तर मे महिन्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
परंतु स्वच्छता पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाचे १९ नवे रूग्ण आढळले आहेत. ६८ सक्रिय रूग्ण आहेत तर मुंबईत सर्वाधिक १५ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा राज्यातील महत्वाच्या शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र लोकसंख्येच्या तुलनेत आढळलेले रूग्ण कमी असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले जात आहे. तसचे बाधित झालेले रूग्ण उपचारानंतर पुन्हा बरे होउन घरी जात असल्याने रूग्णांची संख्या आटोक्यात आहे. मात्र सर्वसामान्यांनी सार्वजनिक ठिकाणी माक्स वापरणे, थुंकू नये अशी काळजी घेणे आवश्यक आहे.