शरद पवारांनी जाती-जातीत विष कालवलं : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar | नागपुरात राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर निशाणा
Raj Thackeray on Sharad Pawar
नागपुरात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on
राजेंद्र उट्टलवार

नागपूर, मागील पाच वर्षातील पक्षपक्षातील स्वार्थी, गलिच्छ राजकारणाला महाराष्ट्रातील जनता कंटाळली असून या राजकारणाची सुरुवात खरेतर शरद पवार यांनीच राज्यात केली. जातीजातीत विष कालविण्याचे कामही त्यांनीच केले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत केला. (Raj Thackeray on Sharad Pawar)

राज्यात आम्हाला पोषक वातावरण

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवार चाचपणी, जाहीर करणे आणि संघटनात्मक आढावा घेण्यासाठी ते काल रात्री नागपुरात आले. छत्रपती चौक येथे त्यांचे व युवा नेते अमित ठाकरे यांचे जल्लोषात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मनसेच्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने राज ठाकरे मराठवाड्यानंतर गेले काही दिवस विदर्भात आहेत. आज त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मविआ नेत्यांना लक्ष्य केले. आगामी निवडणुकीत सर्वांनाच लढायचे आहे. मविआ, महायुतीला लोक कंटाळले असून आम्हाला पोषक वातावरण असल्याचा दावा केला. (Raj Thackeray on Sharad Pawar)

राज्यात  200 -225 जागा आम्ही लढविणार

राज्यात 200 -225 जागा आम्ही लढविणार असून सर्वांच्याच विरोधात मनसे उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. पुलोदच्या स्थापनेपासून राज्यात हेच पक्ष,नेते फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्यावर भर दिला. मराठा आरक्षण संदर्भात आपण आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असून ओबीसी, मराठा समाजातील लहान मुले देखील परस्पर द्वेषातून वागत असल्याची बाब नक्कीच राज्याला भूषणावह नसल्याचे सांगितले. एनसीआर अहवालाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तरप्रदेश, बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरप्रदेश पाठोपाठ बलात्कार, महिला अत्याचाराच्या घटना घडल्या असून हे आजच आहे, असे नाही तर ज्यांनी आज 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यांच्याही काळात हेच चित्र होते, याकडे सविस्तर आकडेवारीसह लक्ष वेधले. यामुळेच मनसेचा पर्याय लोक स्वीकारतील, असा दावा केला. हे नक्कीच होऊ शकते. कधीकाळी भाजपला देखील लोकांनी स्वीकारले नव्हते. 2014 पासून चित्र बदलले, याकडे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी लक्ष वेधले.

Raj Thackeray on Sharad Pawar
आता अल्पसंख्याकांची मते 'मविआ' मिळणार नाहीत : राज ठाकरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news