Sharad Pawar : शरद पवार घरफोडीचे राजकारण करतात: मंत्री धर्मरावबाबा आत्राम

शरद पवारांवर आत्रामांकडून घणाघाती टिका
Heavy criticism of Sharad Pawar from Atrams
शरद पवारांवर आत्रामांकडून घणाघाती टिका Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती, महाविकास आघाडीत धुसफूस तिकीट वाटपापुर्वीच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आता घरफोडीचे राजकारण सुरू केल्याचा आरोप शुक्रवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्याने पवारांच्या दोन गटात राजकारण किती पराकोटीला गेले त्याची प्रचिती येत आहे.

Heavy criticism of Sharad Pawar from Atrams
Sharad Pawar| महाराष्ट्रातही मणिपूरसारखे घडेल : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या मूलामुलींना आपल्याकडे ओढायचे, आमचे घर फोडायचे हे प्रकार त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना शोभा देत नाही, किंबहुना अजितदादा त्यांच्याकडूनच पक्ष फोडाफोडीचे राजकारण शिकले असेही आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार यांच्या संपर्कात असून त्या निवडणूक लढू शकतात असा दावा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

Heavy criticism of Sharad Pawar from Atrams
Sharad Pawar meet Eknath Shinde | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

शुक्रवारी (दि.2) आत्राम यांच्या आरोपांनी तो खरा असल्याची चर्चा रंगली तर सलील देशमुख आमच्या संपर्कात असल्याचे आत्राम म्हणाले होते. एकंदरीत प्रत्येक पक्ष विदर्भात पूर्व तयारीला लागला असताना पूर्व विदर्भातील काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशा अफलातून चुरशीच्या आणि महत्त्वाच्या म्हणजे कौटुंबिक लढती पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news