Sharad Pawar meet Eknath Shinde | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

सह्याद्री अतिथीगृहात दोघांत बैठक सुरू
Sharad Pawar met Chief Minister Shinde
खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. Pudhari News NetWORK

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी आज (दि. २२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. मराठा, ओबीसी आरक्षण आणि अन्य मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news