Sant Gajanan Maharaj Prakat Din 2025
श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. Pudhari Photo

नागपूर: ८०० दिंड्या, भजन मंडळांसह राजवैभवी थाटात निघाली संत गजानन महाराजांची पालखी

Sant Gajanan Maharaj Prakat Din 2025 | भक्तिभावात, उत्साहात प्रगटदिन साजरा
Published on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर परिसरातील श्री सद्‍गरु गजानन महाराज सेवाभावी मंडळाच्या मंदिरातून सायंकाळी निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटात लक्षवेधी ठरली. ‘जय गजानन’ असा जयघोष आणि ‘गण गण गणात बोते’ अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले होते. फुलांची उधळण आणि सुमारे 800 दिंड्या,भजनी मंडळीच्या जयघोषात श्रींची पालखी निघाली. कीर्तन, गोपालकाला, महाप्रसाद आणि कार्यक्रमांचेही ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. (Sant Gajanan Maharaj Prakat Din 2025)

नागपुरातील विविध भागातून तसेच विदर्भासह मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. श्रींची पालखी अश्व, रथ, मेणा, धूप आणि फुलांच्या वर्षाव करणाऱ्या तोफेसह राजवैभवी थाटात पश्चिम नागपूरच्या परिक्रमेसाठी निघाली. आठवडाभरापासून प्रवचन, आख्यान, कीर्तन झाले. दुपारी महापूजेनंतर शोभायात्रा सुरू झाली. प्रारंभी पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, आमदार ऍड अभिजित वंजारी, ऑल इंडिया ज्वेलरी अँड जेम्स कॉंसिलचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे, पोलीस उपायुक्त लोहित मतांनी, सेवेधारी राजू तलमले यांनी पूजन केले.

पालखी मंदिरातून निघून त्रिमूर्ती नगर चौक, पडोळे हॉस्पिटल चौक, गोपाल नगरातून माटे चौक, दुर्गा मंदिर, प्रतापनगर चौक, राधे मंगलम हॉल, एनआयटी गार्डन मार्गे मंदिरात परत आली. अनेक ठिकाणी पालखींची भक्तांनी पूजा केली. मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तांनी थंड पाणी, मसाले भात, सरबताचे स्टॉल लावले होते. शोभायात्रेतील देखाव्यांचे चित्ररथ, आदिवासी नृत्य आणि स्केंटिग करणारी लहान मुले अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काटोल, नरखेड, उमरेड, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या ८०० दिंड्या, पालखी, भजनी मंडळे सहभागी झाली. शोभायात्रेनंतर या सर्व भजनी मंडळ आणि दिंड्या प्रमुखांना श्रीफळ, हार आणि प्रमाणपत्र देऊन श्रीकांत पिसे, विजय कन्हेरे, प्रशांत पिसे, हरिभाऊ गाडेकर, प्रा, रमेश जिभकाटे, प्रमोद जोशी, दत्ता वझरकर, नरेंद्र जगदाळे, युवराज मोटघरे, गोविंद डोंगरे, जयेश मोटघरे, नरेंद्र शेळक, कौशिक आंबेकर, सतीश कोवो, स्नेहा दत्तात्रय, शैली खरे, शुभांगी देवीकर शुभांगी देवीकर शुभांगी वांदिले, श्रद्धा देशमुख, वंदना खोब्रागडे, साक्षी प्रशांत तिमांडे यांच्या हस्ते गौरविण्यात, आले.

रांगोळ्यांनी स्वागत

पालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या घालण्यात आला होत्या. तरुणाईने आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने रांगोळ्या घालून मार्ग सजविला होता. मार्गात अनेक ठिकाणी पालखी थांबवून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

आज महाप्रसाद

त्रिमूर्ती नगरातील श्री सद्‍गरु गजाजानन महाराज सेवाभावी मंडळाच्या गजानन मंदिरात उद्या शुक्रवारी (ता.२१) सायंकाळी पाच वाजतापासून ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sant Gajanan Maharaj Prakat Din 2025
नागपूर : एससी,एसटी समाजाला बजेटमध्ये वाटा द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news