

नागपूर : समता सैनिक दलाच्या वतीने संविधान चौकात गुरुवारी अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मध्ये वाटा आणि त्या वाट्याकरिता कायदा सुनिश्चित करा, बजेट बॅकलाॅग जाहीर करा, एससी, एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये करण्यात यावी, रमाई घरकुल योजनेची मर्यादा 5 लक्ष करा, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उद्योगाकरीता 4 टक्के दराने अर्थ सहाय्य द्या आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
मातंग, चांभार व वाल्मिकी - सुदर्शन जातीच्या विकासाकरिता त्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य द्यावे, जिल्हा सामाजिक न्याय विभागाने दरमहा जनता दरबार भरवून मागासवर्गीयांच्या योजनांची अंमलबजावणी आढावा घ्यावा या मागण्यांसाठी ही निदर्शने, धरणे झाली.
यावेळी प्रदीप गायकवाड, देविदास घोडेस्वार , अॅड. गुणरत्न रामटेके, संजय फुलझेले, शेखर गायकवाड, प्रतिमा कोचे, चंचला मुरारकर, प्रदीप मून, पुष्कराज तिडके,गौतम शामकुवर, हरीश नागदिवे, राहुल सोमकुवर आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.