अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे होता

चालकासह पाचजणांवर गुन्हे; मात्र संकेतला वगळले
Nagpur Hit and Run Case
अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे होताPudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा, रविवारी (दि.८) मध्यरात्री सेंट्रल बाजार रोडवर कारने वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला होता. या अपघातातील कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे. अपघात झाला तेव्हा कारमध्ये संकेत बावनकुळे होता. या अपघातप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. मात्र, अपघातावेळी कारमध्येच असणारा बावनकुळे यांचा मुलगा संकेत याला यातून वगळले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. (Nagpur Hit and Run Case)

संकेतला का सूट?

संकेत आणि त्याचे दोन मित्र अर्जुन जितेंद्र हावरे (वय २४) आणि रोनित चिंतमवार (२७) हे तिघेही धरमपेठमधील लाहोरी रेस्ट्रॉरंट आणि बारमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता ते कारने बारच्या बाहेर पडले होते. सेंट्रल बाजार रोडवरून ते भरधाव जात होते. सेंटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने जीतू सोनकांबळे यांच्या कारला धडक दिली आणि पळून गेले. या धडकेत जीवितहानी झाली नसली, तरी कारचे नुकसान झाले आहे.

कारला धडक दिल्यानंतर त्यांनी थेट पळ काढला. अपघात झाला त्यावेळी संकेत कारमध्येच होता. मात्र, पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले. संकेतला मित्रांनी घरी सोडले. पोलिसांनी चालक जितेंद्र हावरे आणि रोनित चिंतमवार यांना ताब्यात घेतले; मात्र संकेतला का सूट दिली, असा प्रश्न विरोधक करत आहेत.

एफआयआर का नोंद केला नाही?

एवढा मोठा अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळेवर एफआयआर का नोंद केला नाही, संकेतला वाचविण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. पुरावेही नष्ट केले जात आहेत. संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news