Nagpur Heavy Rains | नागपूर : विमानतळाकडे जाणारे रस्ते बंद, सोनेगाव पोलीस ठाणे पाण्यात

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
  Nagpur Heavy Rains
सोनेगाव पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस क्वार्टरला पाण्याचा वेढा पडला.Pudhari News Network
Published on
Updated on
राजेंद्र उट्टलवार

नागपूर: नागपूर शहरासह परिसरात आज (दि. २०) सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दुपारी काहीशी उसंत घेतली असली तरी सखल वस्त्या, अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी असे चित्र आहे. घरामध्ये पाणी शिरलेल्या लोकांची तारांबळ उडाली. वर्धा रोडवर पाणीच पाणी झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूने पाणी भरल्याने पोलिसांनी ते वाहतुकीस बंद केले आहेत. यामुळे काल व आजही हवाई प्रवाशांना फटका बसला. डॉ. हेडगेवार चौक, हॉटेल प्राईड परिसर, मानेवाडा, बेसा, पिपळा या परिसरातील रस्ते देखील पोलिसांनी बंद केले आहेत.

  Nagpur Heavy Rains
नागपूर : अत्याधुनिक 'कमांड अँड कंट्रोल सेंटर'चे लोकार्पण

नागनदी, पिवळी नदी परिसरातील वस्त्यांनाही मोठा फटका

नागनदी, पिवळी नदी परिसरातील वस्त्यांनाही मोठा फटका बसला. सखल वस्त्या, रस्ते तसेच अंडर ब्रीज असलेल्या भागांमध्ये पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन फिरून लोकांनी गरज नसल्यास बाहेर पडू नये, खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन करीत आहे. दुसरीकडे इतरांच्या मदतीची अपेक्षा असणारे शहर पोलीस दलही अडचणीत आल्याचे चित्र आहे. सोनेगाव पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस क्वार्टरला पाण्याचा वेढा पडला असून फ्रीज, वॉशिंग मशीन पाण्यात तरंगताना दिसल्या. मानेवाडा, अयोध्यानगर, सच्चिदानंद नगर, उदयनगर परिसरातील नाल्याचे पाणी घरात, लोकांच्या विहिरीत शिरले. सिमेंट रस्ते व नाल्याचे अर्धवट, सदोष बांधकामविरोधात लोक संतप्त दिसले.

  Nagpur Heavy Rains
नागपूर : वीज अंगावर पडून दांपत्याचा मृत्यू

बजाजनगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झाड पडले

बजाजनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या कार्यालयात झाड पडल्याने बोर्डचे नुकसान झाले. वाहतूक पोलीस कार्यालयात देखील पाणीच पाणी दिसत आहे. दुपारनंतर पावसाची सतत धार सुरू झाली असल्याने सकाळपासून घरात दुकानात पाणी शिरलेल्या लोकांमध्ये दहशत आहे. पुढील ४८ तास पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजच्या पावसाने महापालिकेची पावसाळापूर्व केलेल्या कामाची, नदी नाले, चेंबर सफाईची पुरती पोलखोल झालेली आहे. एकीकडे मनपा प्रशासन कामात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष रस्त्यावर फिरताना महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र असंतोष नागपूरकर व्यक्त करताना दिसले.

  Nagpur Heavy Rains
नागपूर : पारडी उड्डाणपुलावरून कोसळून तरुणाचा मृत्यू

अनेक ठिकाणी अडकले नागरिक

दरम्यान, पिपळा परिसरात एक कुटुंब घराच्या छतावर अडकले असून त्यांना काढताना प्रशासनात विसंवाद दिसला. हद्द कुणाची यात मदतीस विलंब झाला. कामठी तालुक्यातील खेडी गावात १२ लोक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी 'एसडीआरएफ'ची तुकडी रवाना झाली. यात २ अधिकाऱ्यांसह २२ जवानांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news