नागपूर : वीज अंगावर पडून दांपत्याचा मृत्यू

मोहपा येथील ह्रदयद्रावक घटना
Couple dies due to lightning in Mohapa
मोहपा येथे वीज कोसळून दांपत्याचा मृत्यूPudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या बरोबरच सोमवारी (दि.15) कमळेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडासह मुसधार पाऊस झाला. या पावसामध्ये मोहपा येथे अंगावर वीज पडून नवरा-बायकोची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाकर केशव रेवतकर (वय.62) आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर (वय.55)अशी मृत दांपत्याची नाव आहेत.

image-fallback
अमरावतीत अंगावर विज पडून शेतकरी ठार

सोमवारी जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये मोहपा येथे राहणारे रेवतकर दांपत्य पावसापासून बचावासाठी शेताच्या लगत असलेल्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जोरदार पाऊस सुरू असल्याने शिवारातील कोणाचेही या घटनेकडे लक्ष गेले नाही. पाऊस ओसरल्यावर शेवटी काही महिला शेतातून परत येत असताना त्यांनी दोघेही झाडाखाली पडून दिसले. यानंतर परिवारातील सदस्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचारार्थ आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news