Ravikant Tupkar
मुंबई : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधान केले आहे. "शेतकऱ्यांनी आता आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापावे, पण आता मागे हटायचे नाही," असे तुपकर यांनी म्हटले आहे.
सात-बारा कोरा करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार महिना मानधन तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलकांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले की, " बच्चू भाऊंनी आमदाराला कापण्यास सांगितले होते, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, दोन चार मंत्र्याला कापा, पण आता मागे हटायचे नाही,' असे ते म्हणाले.