रामदास आठवले यांच्याकडून नागपूर जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा

Ramdas Athawale | केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीची जाणून घेतली स्थिती
 Ramdas Athawale Nagpur development review
रविभवनात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा बैठक घेतली. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (दि.२१) सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभाग व जिल्ह्याचा आढावा घेतला. (Ramdas Athawale)

या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये व नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतची माहिती आठवले यांनी जाणून घेतली. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, ॲट्रॉसिटी, प्रकरणांची स्थिती, व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम आदींसह दिव्यांग कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही जाणून घेतली. आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागात सुरु असलेली वसतीगृहे, एकलव्य पब्लिक स्कुल, नामांकित शाळा, सैनिकी शाळा आदींची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच केंद्र शासनाच्या जनधन, मुद्रा, प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती जाणून घेतली.

रविभवनात आयोजित बैठकीस अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंह, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, पुरवठा उपायुक्त अनिल बन्सोड, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 Ramdas Athawale Nagpur development review
नागपूर : सुराबर्डीत होणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news