

Nagpur Devendra Fadnavis Election Case
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परंपरागत दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमद्वारे निवडणुकीला आव्हान देणार्या काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना ‘सुप्रीम’ झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (दि.२८) त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणारी प्रफुल्ल गुडधे यांची याचिका न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. विजय बिष्णोई यांच्या खंडपीठाने आज फेटाळली.
यापूर्वी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली ती हायकोर्टानेही खारीज केली. या निवडणुका ईव्हीएमवर घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी गुडधे यांनी या याचिकेतून केली होती. यापूर्वी सुद्धा गुडधे यांनी अनेकदा फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान दिले. पण, प्रत्येकवेळी त्यांना धक्का बसला आहे.