

NCP protest on Nagpur Municipal Corporation
नागपूर : महानगरपालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागातील गंभीर निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात मनपा मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रांगणात आणि प्रवेशद्वारावर कचरा फेकून 'घाण-निषेध' केला. यावेळी प्रतिकात्मकरित्या तोंडावर मास्क परिधान केले होते.
श्रीकांत शिवणकर यांनी यावेळी प्रशासनाला एक प्रतिकात्मक सिंगल यूज प्लास्टिक पैकेट भेट दिले. मनपा प्रशासन 'सिंगल यूज प्लास्टिक'वर बंदी घालण्यातही अपयशी ठरले असल्याचा आरोप केला. प्लास्टिकवर कायमची बंदी घालावी आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करावी! अशी मागणी केली.
मनपा प्रशासनाने जर दोन दिवसांत कचरा ठिकाणांचे सौंदर्यीकरण युद्धपातळीवर सुरू केले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे शहरात तीव्र जन-आंदोलन उभे करेल. मनपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आता जनताच रस्त्यावर उतरेल आणि धडा शिकवेल असा अनिल अहिरकर यांनी इशारा दिला.
यावेळी प्रदेश महासचिव तानाजी वनवे, महिला अध्यक्षा सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, ब्रह्मानंद मस्के, मुकेश रेवतकर, दिनेश रोडगे, राजेश समर्थ, अभिदत्त फाले, राजू मिश्रा, राकेश घोसेकर, चंद्रकांत (कल्ला) नाईक, संतोष भुजाडे, राजेंद्र भोयर, एकनाथ फलके, श्रद्धा राऊत, संजय जोशी, संदीप सातपुते, तुषार ढबाले,
मुमताज बाजी, रवि वाठ, अविनाश पार्डीकर, ऋषी बोराटे, रीतेश लक्केवार, भारत ठाकरे, शोभा येवले, ज्योती कावरे, मनोज जरेल, शोभा येवले, रंजना खोब्रागडे, गौरव तिजारे, विशाल शेळोकर, दीपक लाडसे, अभिषेक पारधी, अनिकेत डोये, कपिल नारनवरे, रोहन नागपुरे, शाहनवाज, गोलू मेश्राम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.