

OBC Federation Agitation
नागपूर : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणातून इतर वाटेकरी होणार नाहीत अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. शनिवार 30 ऑगस्टपासून नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण, आंदोलनाची हाक दिली आहे.
विशेष म्हणजे भाजपचे सत्तारूढ आमदार या आंदोलनात सहभागी होणार असल्याने आता या संघर्षाला राजकीय स्वरूप येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय ओबीसी महा संघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी विदर्भातील दोन-तीन आमदार सोडले तर इतर सर्व आमदार ओबीसी आहेत ओबीसी महासंघाच्या आदरणाचे सहभागी होतील आणि त्यांना अधिकृतपणे निमंत्रित केले असल्याचे स्पष्ट केले कोण कोण आमदार खासदार उद्या येणार ते स्पष्ट होईल यावर भर दिला. भाजपचे आमदार परिणय फुके हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य असल्याने आणि ते वेळोवेळी सर्वच कार्यक्रमात सहभागी होतात आशिष देशमुख यांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे.
किमान दहा लोक उद्या साखळी उपोषणात सहभागी होतील. आज कोकण विभागाची बैठक आहे. त्यानंतरच्या काळात कोकण ,मराठवाडा व राज्याच्या इतरही भागात ओबीसी समाज आपल्या संवैधानिक हक्काच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 43 वर्षे संघर्षानंतर मंडल आयोगातून ओबीसींना न्याय मिळाला. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी ग्वाही दिली असली तरी मराठा समाजाच्या दडपणात काही चुकीचा निर्णय झालाच तर आम्हीही गप्प बसणार नाही असे स्पष्ट केले.