Nitin Gadkari Letter Air India | नागपूरच्या हवाई सेवेला कात्री; नितीन गडकरींचे एअर इंडियाला पत्र

नागपूरच्या उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता
Nitin Gadkari
नितीन गडकरी  File Photo
Published on
Updated on

Air India Nagpur Services Reduced

नागपूर : देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरच्या विमानसेवेत करण्यात आलेल्या कपातीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. एअर इंडियाने मुंबईसह विविध महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणांमध्ये कपात केल्याने नागपूरच्या उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एअर इंडियाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात नागपूरसारख्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक केंद्रासाठी पुरेशी विमानसेवा उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे. विशेषतः नागपूर-मुंबई मार्गावरील सेवा कमी होऊ नयेत अशी विनंतीही गडकरी यांनी केली आहे. अर्थातच गडकरी यांच्या या पत्राची दखल लवकर घेतली जाईल अशी अपेक्षा उद्योजकांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news