Ganja Seized Nagpur | नागपुरात १.१४५ किलो गांजासह तरुण ताब्यात; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
Anti Narcotics Cell Nagpur
Anti Narcotics Cell NagpurPudhari
Published on
Updated on

Anti Narcotics Cell Nagpur

नागपूर:  शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत १ किलो १४५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी शेख जुबेर शेख आबीद (वय २५, रा. चितार ओळी, नागोबा गल्ली क्र. २, महाल) याला ताब्यात घेण्यात आले असून, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते ५ ऑगस्ट रोजी पहाटे १२.३० दरम्यान चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक २ येथील उत्तमचंद मोदी यांच्या घरासमोर करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हवालदार पवन गजभिये यांनी फिर्याद दिली आहे.

Anti Narcotics Cell Nagpur
Nagpur Crime | फ्रेंडशिप डेच्या भेटीचा दुर्दैवी शेवट: लग्नाची मागणी, गिफ्टवरून वाद अन् मैत्रिणीला पुलावरून ढकलले

कारवाईदरम्यान आरोपीकडून १ किलो १४५ ग्रॅम गांजा (किंमत २८,६२५ रुपये) आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४३,६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(२)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यातील शेख इम्तियाज शेख जब्बार (वय ६५) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत सहा गुन्हे तसेच हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या शेख जुबेरविरुद्धही यापूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news