नागपूर: बुटीबोरीत १ कोटी २९ लाखांचा गुटखा जप्त

बुटीबोरी पोलिसांची कारवाई
Butibori police action
बुटीबोरी पोलिसांनी वर्धा वाय पॉईंटवर १ कोटी २९ लाखांचा गुटखा जप्त केला.Pudhari News Network

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीवरून नागपूरमार्गे हैद्राबादकडे कंटेनरमधून नेला जाणारा १ कोटी २९ लाखांचा पानमसाला गुटखा तसेच सुगंधित तंबाखाचा अवैध साठा जप्त करण्यात आला. बुटीबोरी पोलिसांनी सापळा रचून वर्धा वाय पॉईंटवर मोठ्या शिताफीने कंटेनरसहित एकूण १ कोटी २९ लाख २, ७८४ रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला.

Butibori police action
नागपूर : महायुतीची चिंता इतरांनी करू नये, एकत्रच लढणार : प्रफुल्ल पटेल

बुटीबोरी पोलिसांची सापळा लावून कारवाई

दिल्ली येथून नागपूर मार्गे हैद्राबाद येथे कंटेनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पान मसाला तसेच सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मार्गावर पेट्रोलिंग वाढविले. तपासणीत त्यांना वर्धा वाय पॉईंट नजीक एक कंटेनर (एचआर ५५ ए. एल ३५५२) संशयितरित्या उभा असलेला दिसला. पोलिसांनी लगेच चालक एजाज वल्द समीर अहमद (वय २६, रा पर्वभिकाई, जि. अमेठी, उत्तरप्रदेश) याची चौकशी केली. कंटेनरची झडती घेतली असता यात मोठ्या संख्येत प्लास्टिक बोरे असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता १८४ पोती सुगंधित तंबाखू, पानमसाला आढळून आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news