

राजेंद्र उट्टलवार
नागपूर: नागपुरात 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज रविवारी (दि.14 डिसेंबर) दुपारीच सूप वाजले. सत्तापक्ष, महायुती सरकारने हे अधिवेशन फलदायी ठरल्याचे तर विरोधकांनी हे अधिवेशन जमलेबाजी करणारे लक्षवेधी खूप पण विदर्भाकडे दुर्लक्ष करणारे, वांझोटे, मनपा निवडणुकीवर डोळा ठेवणारे होते.
विदर्भाला कुठलाही न्याय मिळाला नाही. विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला. पुढील अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारीपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात ७२ तास ३५ मिनिटे एकूण कामकाज चालले. वाया गेलेला वेळ केवळ १० मिनिटे असून सात दिवसांच्या अधिवेशनात रोज सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे सभागृहात कामकाज झाले.
एकूण बैठका -७
48 तास 16 मिनिटे कामकाज
मंत्री नसल्यामुळे वाया गेलेले 40 मिनिट
शासकिय विधेयके संमत- 4 संमत
एकुण उपस्थिती 75.47 टक्के
शासकिय विधेयके संमत- ६ संमत
सदस्य उपस्थित - ९०. ९८ टक्के
एकुण उपस्थिती ९४ टक्के