Nagpur Crime | सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात अज्ञात तरुणाचा मृतदेह; डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

वाठोडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल; मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Symbiosis College Unidentified Body Found

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात शुक्रवारी ( दि. ७ ) सकाळी एका अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळावरील परिस्थितीवरून अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर दगड घालून हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. वाठोडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले असून, तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून विविध बाबींची पडताळणी सुरू आहे.

Crime News
Nagpur Crime | फ्रेंडशिप डेच्या भेटीचा दुर्दैवी शेवट: लग्नाची मागणी, गिफ्टवरून वाद अन् मैत्रिणीला पुलावरून ढकलले

प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने पांढऱ्या-राखाडी रंगाचा चेक्स असलेला फुल स्लीव्ह शर्ट परिधान केला होता. शर्टच्या कॉलरवर "SELECT" असा उल्लेख असून, त्याने निळ्या रंगाची जीन्स घातली होती. जीन्सच्या मागील खिशावर "DENIM" असे इंग्रजीत लिहिलेले आहे.

घटनास्थळावरील परिस्थितीवरून अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर जड दगडाने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Crime News
Nagpur Crime | नागपुरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी ठाण्यातील तरुणाला अटक

वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, मृताची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित तरुणाची ओळख अथवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, शहरात उघडकीस आलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके नियुक्त केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news