नागपूर विद्यापीठातील राजकारण तापले; सोनू जेसवानी यांचे गंभीर आरोप

Nagpur University | डॉ. कल्पना पांडेंवर कडक कारवाईची मागणी
Sonu Jeswani allegations
डॉ. कल्पना पांडेंवर कडक कारवाई करण्‍याची मागणी व्हीएमव्ही कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी केली.Pudhari News Network
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोणतेही संवैधानिक पद नसताना विद्यापीठाच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करणाऱ्या शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी व्हीएमव्ही कॉलेजच्या हिंदीच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी पत्रकार परिषदेत केली. डॉ. कल्‍पना पांडे यांनी माझे विद्यापीठातील करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले, असा आरोप जेसवानी यांनी यावेळी केला. (Nagpur University)

डॉ. पांडे यांनी अनैतिक मार्गाने पैसे कमावले

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्‍या निलंबनाला डॉ. कल्पना पांडे याच पूर्णपणे जबाबदार आहेत. डॉ. पांडे यांनी अनैतिक मार्गाने पैसे कमावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पीएचडीचे ऑनलाईन अहवाल थांबवणे, प्राध्यापकांना ब्लॅकमेल करणे, कंत्राटी प्राध्यापकांच्या पगारातून दहा-वीस टक्के रक्कम कापून स्वत:च्‍या खिशात टाकणे, अनुभवाचा प्राधान्यक्रम पूर्णपणे नाकारून कनिष्ठ प्राध्यापकांना कॉलेज ऑडिट कमिटीत पाठवणे, आदी अवैध कृत्‍यांमध्‍ये त्‍या सहभागी असल्याचा आरोपही जेसवानी यांनी केला. (Nagpur University)

भाजप नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून पांडेंचा  कोट्यवधींचा भ्रष्टाचार

निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे डोळे मिटून डॉ. पांडे यांच्या प्रत्येक अनधिकृत, अन्यायकारक आदेशाचे पालन करत होते. धवनकर प्रकरण आणि मनोज पांडे प्रकरणाच्या फाईल्स मिळाल्यास सर्व काही सत्य समोर येईल, असेही त्या म्हणाल्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून पांडे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असे गंभीर आरोप जेसवानी यांनी यावेळी केला. (Nagpur University)

Sonu Jeswani allegations
नागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के वीज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news