नागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के वीज

सौर उर्जेद्वारे मोफत वीज देण्याची महावितरणची तयारी
Nagpur Mahavitran News
महावितरण देणार सौरउर्जेद्वारे मोफत वीजPudhari File Photo
Published on
Updated on

प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे. याबाबत निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौर उर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली,सिंधी ), नागपूर शहर मंडळ ( किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन) या दोन गावांना याचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज

निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना 3 किलोवॅट पर्यंत 78000 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक आणि औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.

महावितरणव्दारे निवडलेली शंभर गावे

जालना जिल्हा (पातोडा,दारेगाव), बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी), लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी), हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव ), नांदेड जिल्हा ( हाडोळी,दवणगिर), परभणी जिल्हा ( आंबेटाकळी, मुरूमखेडा), पेण मंडळ (पाडवी पठार, वडवल ), वाशी मंडळ ( नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव), धुळे जिल्हा ( कलगाव, नाथे), जळगाव जिल्हा ( निंबोल, पातोंडी), नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राहमणपुरी), कल्याण मंडळ-1 ( शिरवली कुंभारली), कल्याण मंडळ-2 (गोलभान, मोहोप ), पालघर जिल्हा ( अक्करपट्टी, कोलगाव), वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण ).

रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असूर्डे), अहमदनगर जिल्हा ( पारेगाव, हिवरे बाजार), मालेगाव मंडळ (वाके, निंबोळा ), नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी), अकोला जिल्हा ( सौंदाळा, सांगलुड), बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुताळा खुर्द), वाशिम जिल्हा ( झकलवाडी, पारवा ), अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा ), चंद्रपूर जिल्हा ( सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली जिल्हा (कोंढाणा तुंबडी मेंढा ), भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव ),वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापुर ), बारामती मंडळ (वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव), सातारा जिल्हा ( मान्याची वाडी), सोलापूर जिल्हा ( चिंचणी, औज), कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी ), सांगली जिल्हा (झुरेवाडी निमसोड ), गणेशखिंड मंडळ ( शिवतीर्थ नगर, सेक्टर 25 निगडी) या गावांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news