

नागपूरृ, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील नागपूर- उमरेड रोडवर भिवापूरजवळ आज (दि. ५) दुपारी ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात (Nagpur Accident News) झाला. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २3 जण जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सचा नं (MH49J8616) असा असून ट्रक नं. (MH 31AP29660) आहे. नागपूरवरून सिंदेवाहीमार्गे मूलकडे निघालेली ही बस माँ दुर्गा ट्रॅव्हल्सची होती. (Nagpur Accident News)
भरधाव ट्रकने या खासगी बसला समोरून धडक दिल्यानंतर हा ट्रक काही अंतरावर जाऊन उलटला. बसच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. ४ जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरातील, आजूबाजुच्या गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस व रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर रुग्णांना नागपूरच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
1) जसवंत वसंतराव बावनकर (वय 55, रा. उमरेड) हे नागभीड येथे जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक होते.
2) संजय येगेश्वर सोनकुसरे (वय 48, रा. शांतीनगर, नागपूर)
3) सुरेखा अंकुश ठवरे (वय 42, रा. नाड शिवणफड, ता. भिवापूर)
4) नैतिक जितेंद्र मडावी (वय 14, रा. कन्हाडगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर)
समिक्षा वसंता धारणे (वय १०, दिघोरा, भिवापूर), शालीक अर्जुन कुंभरे (वय ३५, चंद्रपूर) , अल्केश शामकुवार तिवाडे (वय ४५, उमरेड), मारोती अर्जुन लांजेवार (वय ६०, नागपूर), शोभा रामकृष्ण गजभिये (वय ६०, मोहाडी ता. नागभीड), राजु राजेंद्र थुल, प्रिया नंदलाल पटेल (वय २१, सिंदेवाही), भारती अभय गजघाटे (वय १७, नागपूर) , अनुराग महादेव सलोरे (वय २२, नागभीड), रवी मोतीराम वाघमारे (वय ४५, धर्मापूर) पौणिमा दुर्वास निकुरे (वय २५, आवळगाव ता.नागभीड), प्रमोद मारोती बिजेवार (वय ५३, सिंदेवाही), सुदाम उळकुजी मेश्राम (वय ६८, सिंदेवाही), केशर माला शालीक कुंभरे, (वय ४०), आदित्य शालिक कुमरे (७ वर्षे), आदर्श शालिन कुंभरे (वय ५ ) हे सर्व रहिवासी पात्री (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमींना नागपूर मेडीकल कॉलेज येथे हलविले आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर मेश्राम, डॉ. विपलो कामडी , डॉ. मून यांनी जखमी रुग्णावर प्राथमिक उपचार केले.