

Chintaman Vanjari Custody
नागपूर: शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी माजी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भंडारा येथे या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांना अटक झाली.
एसआयटी स्थापन झाल्यानंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत 19 जणांना अटक झाली. बोगस शालार्थ आयडी शिक्षक भरती घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मुद्दा वादळी ठरल्यानंतर राज्य शासनामार्फत विधानसभेत चौकशीची घोषणा करण्यात आली. भंडाऱ्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र पंजाबराव सलामे यांना 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. चिंतामण गुलाबराव वंजारी (वय 57, रा. प्लॉट नंबर 90, वैशाली सोसायटी, यवतमाळ) यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालय समक्ष हजर केले असता वाढीव पीसीआर घेण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणातील इतर आरोपी धनराज शिवराम हुकरे, सुरेश प्रेमलाल मेंढे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी यास विरोध केल्याने जिल्हा सत्र न्यायालय न्यायालयाने हे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले.