

Ravindra Salame custody Teacher Recruitment Scam
नागपूर: भंडारा जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळ्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर विभागीय उपसंचालक नरड यांना अटक झाली. आतापर्यंत 19 जणांना अटक झाली. बोगस शालार्थ आयडी शिक्षक भरती घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत हा मुद्दा वादळी ठरल्यानंतर करण्यात आली.
भंडाऱ्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र पंजाबराव सलामे (वय 45) आजवर फरार होते. त्यांना एसआयटीने अटक केली आहे. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. शालार्थ आयडी घोटाळा घडला. तेव्हा रवींद्र सलामे भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. शिक्षक भरती घोटाळ्यात आरोपी पुडके (रा. लाखनी, जि.भंडारा) यांची भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा येथे नानाजी पुडके विद्यालयात मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्तीच बोगस होती.
नागपूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचे नियुक्ती मान्यता आदेश, सेवा सातत्य एस के बी शाळा यादव नगर नागपूर या शाळेच्या लेटरहेडवर अशा सगळ्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नियुक्ती केली गेली. कागदपत्रे देण्यात सलामे हे मुख्य सूत्रधार होते. शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनीच पुडकेचा प्रस्ताव विभागीय उपसंचालकांकडे सादर केला होता, असेही तपासात पुढे आले आहे.