Nagpur swine flu cases | 'नागरिकांनी मास्क वापरावे', नागपुरात स्वाइन फ्लूचा वाढता फैलाव; ८८ जणांना संसर्ग

आरोग्य विभाग सतर्क; नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन
Swine Flu
Swine FluPudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : नागपूर  शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत शहरात ८८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची नोंद महानगरपालिका आरोग्य विभागाकडे झाली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणे म्हणून ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. अशी लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Swine Flu
Nagpur News : ‘पुत्रयोगा’चा दावा फेल? चौथ्या अपत्याचा जन्म, मुलाऐवजी मुलगी!

शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून रोग निगरानी आणि परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. नागरिकांनीही आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केल्यास संसर्गाचा फैलाव नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

Swine Flu
Nagpur Crime : मुलांच्या वादातून तरुणाचा खून; लोखंडी रॉडने हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news