Nagpur Soldier Martyred | आसाममध्ये लढाऊ विमान अपघातात नागपूरच्या जवानाला वीर मरण

आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात सुखोई-३० एम.के.आय. फायटर जेटचा भीषण अपघातात
Fighter Plane Crash Assam
पूर्वेस दुरगकरPudhari
Published on
Updated on

Fighter Plane Crash Assam

नागपूर : आसाममध्ये झालेल्या भारतीय वायू सेनेचे विमान अपघातात दोन वायुसेना अधिकारी शहीद झालेले आहेत. या विमान अपघातात नागपुरातील 28 वर्षीय पूर्वेस दुरगकर यांना वीरमरण आले आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष येथे प्राप्त माहितीनुसार आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात काल झालेल्या सुखोई-३० एम.के.आय. फायटर जेटच्या भीषण अपघातात भारतीय वायुसेनेचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर अशी दोघांची नावे आहेत. यातील फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरुगकर हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून डीएसए अकादमी, शहापूर जिल्हा भंडारा येथे त्यांनी शिक्षण घेतले.

Fighter Plane Crash Assam
Nagpur news | नगरसेविका, महापौर आणि आता मायाताई इवनाते होणार खासदार

भारतीय वायुसेनेचे हे फ्रंटलाईन फायटर जेट गुरुवारी नियमित सराव करत असताना अचानक रडारवरून बेपत्ता झाले. आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगराळ भागावरून उड्डाण करत असताना विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र या अपघातात दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news