नागपूर: शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

नागपूर: शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव जन्मोत्सव सोहळा नागपुरात ढोलताशा पथकांचा निनाद, शिवरायांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी यासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

गांधी गेट महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सकाळी दुग्ध अभिषेक करुन महाआरती पार पडली. यानंतर महाराजांची पालखी काढण्यात आली. शिवमुद्रा ढोलताशा पथकाकडून शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यात आली. राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव समितीकडून दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यासोबतच शहराच्या विविध भागात शिवजयंतीचा उत्साह रॅली, वेशभूषा स्पर्धा, फटाका, लेझर शो आदी कार्यक्रमांनी ओसंडून वाहताना दिसला. सक्करदरा चौकात बाल कलाकारांचे ढोलताशा पथक लक्षवेधो ठरले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news