Nagpur SBL Blast Death | दोन महिन्यांची मृत्यूशी झुंज संपली: एसबीएल स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू

स्फोटातील मृतांची संख्या 25; सर्वाधिक महिला कामगार
Nagpur SBL Blast
Nagpur SBL BlastPudhari
Published on
Updated on

SBL blast injured woman death

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एसबीएल स्फोट प्रकरणातील गंभीर जखमी असलेल्या दुर्गा गाडगे यांचा आज (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटात आतापर्यंत 25 कामगारांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक महिला कामगार आहेत.

या भीषण स्फोटात दुर्गा गाडगे या 60 टक्के जळाल्या होत्या. ऑरेंज सिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अखेर त्यांचा तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतर आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

Nagpur SBL Blast
Nagpur News : धामणगाव आग, प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख, तातडीने दहा उपाययोजना

अडीच वर्षात जिल्ह्यात 47 कामगारांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे ४७ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नागपूर जिल्ह्याची ओळख 'टायगर कॅपिटल' म्हणून आहे, परंतु दुर्दैवाने आता जिल्ह्याची ओळख 'स्फोटांची राजधानी' म्हणून होणार का? अशी खंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

अनिल देशमुख यांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्यातील सर्व स्फोटक कारखान्यांच्या 'सेफ्टी ऑडिट' ची आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news