नागपूरची ऐतिहासिक मारबत : यंदा बडग्यांच्या निशाण्यावर महागाई, स्मार्ट मीटर आणि डोनाल्ड ट्रम्प!

Nagpur News : मारबत मिरवणुकीसाठी नागपूरकर सज्ज
Nagpur News
नागपूरची ऐतिहासिक मारबत
Published on
Updated on

नागपूर : नागपूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आणि मध्य भारताचे सांस्कृतिक वैभव असलेला मारबत, बडगे उत्सव आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला ही मिरवणूक काढली जाते. ती बघण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरतो. देशभरात या प्रकारची मिरवणूक निघत नाही. यंदा पिवळी मारबत उत्सवाचे १४४ वे वर्ष आहे. अमृत महोत्सवी मनपाने या संदर्भातील विशेष होर्डिंग जागोजागी लावले आहेत. यावेळी या उत्सवात पहलगाम दहशतवादी हल्ला,डोनाल्ड ट्रम्पची हुकुमशाही, स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त करणारे बडगे ..! आणि घेऊन जा गे मारबत... चा जयघोष ऐकायला, बघायला मिळणार आहे.

शहरातील विविध मंडळे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे बडगे सादर करणार आहेत. यावर्षी दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता यासोबतच या महोत्सवात पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अवास्तव कराच्या धोरणावरही टीका केली जाणार आहे. एकंदरीत नागपूर, विदर्भ यासोबतच नागपूरकर तरुण आता आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाही हात घालणार आहेत. परंपरागत पिवळी, काळी,लाल मारबत यासोबतच नागपुरातील नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्हीटी पार्क चौक, अमरावती रोडसह विविध भागांतून आकर्षक बडगे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पावसाळी वातावरणाचे सावट असले तरी तरुणाईचा उत्साह कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला हा महोत्सव मनातील अदृश्य असंतोष व्यक्त करणारा असल्याने पोलिसांनीही आवश्यक बंदोबस्त तैनात केला आहे.

Nagpur News
Samruddhi Mahamarg Landslide | नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा दरम्यान कोसळली दरड

मुळात मारबत हा केवळ धार्मिक सण नाही. “इडा-पीडा घेऊन जा रे मारबत” अशा घोषणांमधून लोक आपल्या अडचणी, समस्या आणि त्रास यांचे प्रतीकात्मक उच्चाटन करतात. यंदा महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे दुःख, तसेच स्मार्ट मीटरच्या बिलांबद्दलचा असंतोष मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणार असल्याचे दिसते. नागरिकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

असा आहे मारबत उत्सवाचा इतिहास

इंग्रजांच्या राजवटीत लोक विविध अत्याचारानी त्रस्त होते. देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून १८८५ मध्ये नागपूरात तराने तेली समाजातर्फे पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना झाली. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी पिवळी मारबत मिरवणूक सुरू केली. जागनाथ बुधवारी परिसरात यानिमित्ताने यात्रेप्रमाणे धार्मिक, उत्सवी वातावरण असते. मुलाबाळांना सुखी ठेव म्हणून तिची पूजा केली जाते. दुपानंतर गांधीगेट परिसरात काळी पिवळी मारबत मिलन बघण्यासारखे असते.

Nagpur News
Nagpur Voilence: नागपूर दंगल पूर्वनियोजित कट; तथ्यशोधन समितीच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news