

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या संविधान चौकात आज बुधवारी अंगणवाडी सेविकांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. संविधान चौकातच अंगणवाडीची शाळा भरवून हे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे मागील अनेक दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात रस्ता रोको, घेराव आणि नंतर जेलभरो आंदोलन केल्याने बराच काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
अंगणवाडी सेविकांनी आज पुन्हा संविधान चौकात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडीची शाळा भरवत अफलातून आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूचं राहील आणि यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
हेही वाचा