

Vote Count Difference
नागपूर : नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पराभूत झालेले काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निवडणूक आयोग, भाजप संगणमताचा आरोप केला आहे. गुडघे यांच्या मते यांच्या मते, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान 33 हजार 712 मतदारांची नावे वाढली. प्रत्यक्ष घरांना भेटी दिल्यानंतर त्याचे तारीख व वेळेनुसार फार्म सहामध्ये नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र ते न करता सरसकट एकाच मोबाईलवर 50 ते दीडशे मतदारांची नोंदणी करण्यात आली.
या ठिकाणी 8 टक्के मतदार वाढ झाल्याचा, अनेक बुथवर 20 ते 50 टक्के मतांची सूज आल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. काँग्रेसला वातावरण अनुकूल नव्हते तर लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत 10 हजार मतदारांची वाढ कशी झाली असा थेट सवाल प्रफुल्ल गुडधे यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजप निवडणूक आयोग संगनमतातून हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप केला. गुडधे यांनी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दक्षिण पश्चिम मतदार संघ हा बहुतांशी लोकांकडे मोबाईल असलेला सुशिक्षित मतदारसंघ असताना एकाच मोबाईलवरून दीडशे लोकांची नोंदणी का करण्यात आली.
निश्चितच हे बोगस मतदार आहेत. आपल्याला माहिती अधिकारातून 33 हजार 712 मतदार वाढल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आता संपूर्ण मतदार यादीची पडताळणी करा व नव्याने मतदार यादी करा, निवडणूक रद्द करा अशी मागणी केली.