Nagpur News | अंबाझरी तलावातील किशोरीला वाचविणाऱ्या जिगरबाज जलतरणपटूंचा पोलिसांकडून सत्कार

 जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून किशोरीला दिले नवजीवन
Ambazari Lake Rescue
अपर पोलीस आयुक्त विनिता साहू यांच्या हस्ते सीताबर्डी पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आलाPudhari
Published on
Updated on

Ambazari Lake Rescue

 नागपूर : अंबाझरी तलावात उडी घेतलेल्या १६ वर्षीय किशोरीला जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून ‘शार्क अॅक्वाटिक क्लब’च्या प्रशिक्षु जलतरणपटूंनी सुखरूप बाहेर काढले. प्रसंगावधान राखत केलेल्या या धाडसी बचावकार्यानंतर किशोरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती आहे. या जिगरबाज जलतरणपटूंच्या धाडसाची दखल घेत अपर पोलीस आयुक्त विनिता साहू यांच्या हस्ते सीताबर्डी पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.

सीताबर्डी परिसरातील १६ वर्षीय किशोरी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. तिच्याकडून सुसाइड नोट आढळल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिचा शोध सुरू केला होता.

Ambazari Lake Rescue
Nagpur news: भारतात बेकायदेशीर वास्तव्य भोवले! नागपूर न्यायालयाचा बांगलादेशी पती-पत्नीबाबत मोठा निर्णय

दरम्यान, अंबाझरी तलावात एका किशोरीने उडी घेतल्याची माहिती मिळाली. तलाव परिसरात उपस्थित असलेल्या शार्क अॅक्वाटिक क्लबच्या सदस्यांनी किशोरीला पाण्यात उडी घेताना पाहताच क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. अक्षय नवले, इशांत पांडे, राजनंदिनी समर्थ, लावण्या राऊत, राहुल लांजेवार आणि श्रीमथ मुले या प्रशिक्षु जलतरणपटूंनी तलावात उडी घेत किशोरीला वाचविण्याचा प्रयत्न केला.

मूकबधिर जलतरण प्रशिक्षक विजय सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणपटूंनी किशोरीला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले. मात्र, पाण्यात बुडण्याच्या भीतीने घाबरलेल्या किशोरीने बचावासाठी आलेल्या जलतरणपटूंनाच घट्ट पकडले. त्यामुळे काही काळ बचावकार्यातील सर्वांच्याच जीवाला धोका निर्माण झाला होता. तरीही जलतरणपटूंनी प्रसंगावधान राखत किशोरीला सुरक्षितपणे तलावाबाहेर आणले. त्यानंतर किशोरीला उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर व सुरक्षित असल्याची माहिती आहे. 

Ambazari Lake Rescue
Nagpur News: ४९० शासकीय आदिवासी वसतिगृहांचा मानकर ट्रस्टसोबतचा करार रद्द करा; अन्यथा RSS मुख्यालयाला घेराव

पोलिसांकडून धाडसी तैराकांचा गौरव

या साहसी बचावकार्यात योगदान देणाऱ्या अक्षय नवले, इशांत पांडे, राजनंदिनी समर्थ, लावण्या राऊत, राहुल लांजेवार, श्रीमथ मुले आणि प्रशिक्षक विजय सरदार यांचा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस आयुक्त विनिता साहू यांनी त्यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले.याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस अधिकारी यशराज पोमन तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण गाढवे आणि रत्नाकर देवकाते यांचाही सत्कार करण्यात आला. सीताबर्डी व अंबाझरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news