Nagpur Protest | संविधान चौकात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शांती मार्च; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले
Sonam Wangchuk Support Protest
Sonam Wangchuk Support ProtestPudhari
Published on
Updated on

Sonam Wangchuk Support Protest

नागपूर : दिल्लीतील संसदेकडे निघालेल्या मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सोमवारी नागपूरच्या संविधान चौकात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांच्या वतीने शांती मार्च व धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.

व्हरायटी चौकातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी संविधान चौकात एकत्र येत निदर्शने केली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही कार्यकर्ते हातात बॅनर आणि फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

Sonam Wangchuk Support Protest
Nagpur News : स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा संसदेत मांडा, विदर्भवाद्यांचे गडकरी यांना निवेदन!

यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत विविध मागण्या मांडण्यात आल्या. "शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. जात, धर्म, पंथ आणि पक्षीय भेद बाजूला ठेवून शिक्षणाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान चौकात दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाही सहभाग

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Sonam Wangchuk Support Protest
Sonam Wangchuk Hunger Strike: 'आजच उपोषण संपवेन, पण....; सोनम वांगचुक यांच्या 3 अटींनी दिल्लीत खळबळ; सरकारसमोर मोठं आव्हान

या आंदोलनात माजी खासदार प्रकाश जाधव, किशोर पराते, सागर डबरासे, हरिभाऊ बनाईत, विक्रम राठोड, किशोर ठाकरे, मंगलाताई राणे, उमेश निकम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news