Nagpur News | शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी

दोन्ही प्रकल्पाकरिता हुडकोशी करार करणे व आवश्यकतेनुसार कर्ज मागणी करण्याबाबतचे अधिकार महानगर आयुक्त यांना प्रदान करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी
Nagpur News | शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी
Pudhari
Published on
Updated on

Nagpur Outer Ring Road

नागपूर: शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट (ट्रक अँड बस टर्मिनस) विकसित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्र (आयबीएफसी) नवीन नागपूर अंतर्गत विकसित करणे तसेच या दोन्ही प्रकल्पाकरिता हुडकोशी करार करणे व आवश्यकतेनुसार कर्ज मागणी करण्याबाबतचे अधिकार महानगर आयुक्त यांना प्रदान करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) ११वी बैठक मुख्यमंत्री, तथा अध्यक्ष नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News | शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी
Nagpur News: धक्कादायक! नागपुरात ट्रिपल आयटीच्या ९ व्या मजल्यावरून उडी घेऊन कोल्हापूरच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच २०२६-२०२७ च्या अनुमानित अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली.

नागपूर महानगर प्रदेश क्षेत्राकरिता भविष्यातील लागणाऱ्या पाण्याची निकड लक्षात घेता, गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातून नागपूर महानगर क्षेत्रापर्यत जलवाहिनी टाकण्याकरिता जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रस्तावित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी होत असलेल्या जमिनीचे भूसंपादनाअंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरीता अधिकचे 10.0 मी. रुंदीचे व अंदाजित 50.0 कि.मी. लांबीचे जमिनीचे अधिग्रहण जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पात अंतर्भूत करण्याबाबत मंजूरी प्रदान करण्यात आली.

Nagpur News | शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी
Nagpur News : धामणगाव आग, प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख, तातडीने दहा उपाययोजना

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सामायिक मुद्रेला मान्यता देण्यात आली व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लोगोचा वापर व्यापार चिन्ह म्हणून कॉपीराईटसह वापर करण्यास प्राधिकरणाने मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news