

OBC chain hunger strike
नागपूर : नागपूर येथील संविधान चौकात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सचिव स्तरावरील 12 मागण्या मान्य करण्यात आल्या.
तर दोन मागण्यांबाबत कॅबिनेट्स स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना पाणी देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार परिणय फुके उपस्थित होते.
डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, ज्या उर्वरित दोन मागण्या आहेत. त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवल्या जाईल. ओबीसी साठी उपसमिती गठीत करण्यात आली आहे, याचे स्वागत आहे. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन शिष्टमंडळ पाठवून मागण्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलनही मागे घ्यावे, परंतु जेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, त्यावेळी आम्ही आंदोलन करू, आमचे नागपुरातील आणि इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन आम्ही मागे घेत आहोत.