Nagpur news | मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

या कामबंद आंदोलनामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे
Nagpur news | मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Published on
Updated on

नागपूर : महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून एल व सीएल रजेचे पैसे मिळाले नाहीत. मागील महिन्याचा पगारही अद्याप अदा करण्यात आलेला नाही. याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

कंपनीकडूनही पुढील काही दिवसांत पगार मिळण्याबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या समस्यांबाबत कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी 11 जून 2026 पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Nagpur news | मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Jalna Municipal Workers Protest : थकीत पगारासाठी कर्मचाऱ्यांचे उपोषण

आंदोलनाचा आज दुसरा दिवस असूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वेळेवर पगार आणि थकीत रजेचे पैसे मिळणे हा कामगारांचा मूलभूत हक्क असून, तो पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, या कामबंद आंदोलनामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे.

Nagpur news | मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Mahavitaran Contract Workers Strike: वेतनाअभावी महावितरणचे कंत्राटी कामगार आक्रमक; पालघरमध्ये कामबंद आंदोलन सुरू

याबाबत पॉवरफंड वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष गौरव मेश्राम, सचिव रितेश तांगडे, सहसचिव केतन लांजेवार आणि सदस्य सनी चंद्रिकापुरे यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व रजेचे पैसे अदा करावेत, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news