Nikhil Gaikwad photography | नागपूरचा निखिल गायकवाड छायाचित्रातून भरला जगाच्या नजरेत!

Nikhil Gaikwad photography |
Nikhil Gaikwad photography | नागपूरचा निखिल गायकवाड छायाचित्रातून भरला जगाच्या नजरेत!
Published on
Updated on

नागपूर : नागपूरचा निखिल गायकवाड छायाचित्रणाच्या दुनियेत जगाच्या नजरेत भरला आहे. 35 वर्डस (35-WORDS) छायाचित्रण स्पर्धेत 2% मध्ये, जगातील टॉप 100 च्या उंबरठ्यावर सध्या तो आहे. 170 अधिक देशांतील सहभाग, 1.12 लाख स्पर्धक असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात केवळ 2,236 स्पर्धकांमध्ये नागपूरच्या निखिलने दमदार झेप घेतली आहे.

12,813 फोटोग्राफर्स, 4.61 लाखांहून अधिक फोटो सबमिशन अशा या महासागरातून केवळ 2,236 फोटोग्राफर्ससह (टॉप 2%) अंतिम टप्प्यात पोहोचत नागपूरकर निखिल गायकवाड ठामपणे उभा आहे. त्याच्या एका फोटोची फायनल शॉर्टलिस्टमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे 4.61 लाख फोटोंमधून केवळ 6,104 फोटो अंतिम स्तरावर पोहोचले आहेत. आता टॉप 100 कडे निर्णायक पाऊल टाकलेला निखिल आता फायनल ज्यूरी स्टेजमध्ये असून, 50 आंतरराष्ट्रीय जजेस अंतिम निवड करणार आहेत. वर्षभर जागतिक स्तरावर ही स्पर्धा सुरू असून अंतिम निर्णय एप्रिल, मे 2026 पर्यंत अपेक्षित आहे. यापूर्वी गोव्यात टॉप 4 ट्रॅव्हल क्रिएटरमध्येही निवड झाली. निखिल गायकवाड केवळ फोटोग्राफर नाही, तर तो एक व्हिज्युअल स्टोरीटेलर आणि क्रिएटिव्ह उद्योजकही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news