Nagpur news: डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न द्या, अल्पसंख्याक मोर्चाची मागणी

Dr Hedgewar Bharat Ratna demand: अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे मागणी केली आहे
Nagpur news: डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न द्या, अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
Published on
Updated on

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना मरणोपरांत 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी केली आहे. सिद्दिकी यांनी यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

Nagpur news: डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न द्या, अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
RSS | रा.स्व.संघाच्या विजयादशमी सोहळ्यात डॉ के.राधाकृष्णन प्रमुख अतिथी

संघाचा शताब्दी वर्ष आणि विजयादशमी सोहळा जवळ आलेला असताना, अल्पसंख्याक मोर्चाकडून आलेल्या या मागणीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आहे. जमाल सिद्दिकी यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात, डॉ. हेडगेवार यांनी देशासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत आणि समाजकार्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न'ने सन्मानित करणे योग्य ठरेल.

Nagpur news: डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न द्या, अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम आज गुरूवारी (दि.02) आयोजित करण्यात आला आहे. जो संघाच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मोर्चाने केलेली ही मागणी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news