RSS | रा.स्व.संघाच्या विजयादशमी सोहळ्यात डॉ के.राधाकृष्णन प्रमुख अतिथी

पुढील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत.
RSS
RSSFile Photo
Published on
Updated on

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या विजयादशमी उत्सवाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ के. राधाकृष्णन प्रमुख अतिथी राहणार आहेत. पुढील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत.

लवकरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघ चालक काय मार्गदर्शन करतात याविषयीची राजकीय वर्तुळात उत्सुकता असणार आहे. रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या विजयादशमी सोहळ्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन प्रमुख अतिथी असतील सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

आद्यसरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी 25 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली. विजयादशमीला संघाचा स्थापना दिन असतो.या कार्यक्रमात दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित केले जाते. संघाची भविष्यातील भूमिका स्पष्ट करणाऱ्या या कार्यक्रमाकडे देशाचे,भाजप आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news