नागपूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या 19 जानेवारी पासून तीन दिवसीय 'खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. (Nagpur news)