Nagpur news | अखेर विधानपरिषदेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा हात कुणाला ?

काँग्रेसचा अद्याप उमेदवारही ठरलेला नसल्याने काँग्रेसने ही निवडणूक अविरोध करावी, गटबाजी टाळावी ; भाजपचा सबुरीचा सल्ला
Nagpur news | अखेर विधानपरिषदेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा हात कुणाला ?
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी अखेर भाजपने माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना मोठी संधी दिली आहे. अनेकदा आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली. यावेळी भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेता त्यांचा विजय निश्चित मानला जातो. किंबहुना काँग्रेसचा अद्याप उमेदवारही ठरलेला नसल्याने काँग्रेसने ही निवडणूक अविरोध करावी, गटबाजी टाळावी असा सबुरीचा सल्ला देखील भाजपने दिला आहे.

Nagpur news | अखेर विधानपरिषदेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा हात कुणाला ?
Parbhani Hingoli MLC Election : विधान परिषदेसाठी ‌‘हापूस बॉक्स पॅटर्न‌’चर्चेत!

आता काँग्रेस कुणाला हात देणार हे आज उघड होणार आहे. एकप्रकारे जिल्ह्यातील कलमेश्वर येथे रुग्णसेवा करणारे डॉ. पोतदार यांना आता खऱ्या अर्थाने जनसेवा करण्याची संधी आहे. गेले काही दिवस त्यांनी संघटनात्मक जबाबदारी सांभाळतानाना अनेकांना आमदार केले. मात्र पक्षाने विधानसभेला उमेदवारी देऊनही त्यांना निवडून येता आले नाही.

Nagpur news | अखेर विधानपरिषदेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काँग्रेसचा हात कुणाला ?
Parbhani Hingoli MLC Election : राष्ट्रवादी-शिंदे सेनेत विधानपरिषदेसाठी रस्सीखेच

मध्यंतरी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोतदार यांना संधी द्या अशी विनंती पक्षनेतृत्वापुढे केली होती. आता त्यांना संधी मिळाली आहे. सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प बोलून दाखविला. दुसरीकडे काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर जबाबदारी टाकल्याने त्यांच्याच गटाचा उमेदवार असण्याची शक्यता बळावली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा भाजप आणि सुनील केदार असा सामना नागपूर जिल्ह्यात रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news