Nagpur Railway News | नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम अंतिम टप्प्यात; दिवाळीपूर्वी इतवारी-उमरेड मार्गाचे लोकार्पण

नागपूर-नागभीड ब्रॉडगेजमुळे १२ गावांना महानगराशी थेट जोडणी : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Nagpur Railway News
मंत्रालयात परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महारेल कार्पोरेशनच्या कामाची आढावा बैठक घेतलीPudhari Photo
Published on
Updated on

नागपूर - नागपूर ते नागभीड हा १०६ किलोमीटरचा नॅरोगेज लोहमार्ग ब्रॉड गेजमध्ये रुपांतरीत करण्याचे काम गतीने पूर्ण होत असून, दिवाळीपूर्वी इतवारी ते उमरेड या ५१ किमी मार्गाचे लोकार्पण होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयात महारेल कार्पोरेशनच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महारेल कार्पोरेशनचे उपाध्यक्ष जैस्वाल, परिवहन विभागाचे उपसचिव किरण होळकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Nagpur Railway News
Manikrao Kokate : मी रमी खेळलो नाही, दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन : माणिकराव कोकाटे

सरनाईक म्हणाले , नागपूर जवळील इतवारी स्थानकापासून नागभीड पर्यंत सुमारे १०६ किलोमीटरचा नॅरोगेज लोहमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश महारेल कार्पोरेशनला दिले आहेत.या लोहमार्गाच्या नुतनीकरणामुळे १२-१४ छोट्या मोठ्या गावांना लोहमार्गाने नागपूर सारख्या महानगराशी जोडता येईल.

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त

सन. २०१६ मध्ये महाराष्ट्र शासन व केंद्रीय रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त भागीदारीतून महारेल कार्पोरेशन या संस्थेची स्थापना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला " रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र " हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील सर्व रेल्वे फाटकाचे रूपांतर रेल्वे उड्डाणपूल मध्ये करण्याची मोठी जबाबदारी महारेल कार्पोरेशनवर टाकण्यात आली आहे. हे रेल्वे उड्डाणपूल देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी महारेल कार्पोरेशनला दिल्या.

Nagpur Railway News
Devendra Fadnavis | शरद पवारांनी असे शब्द माझ्या साठी वापरणे हा त्यांचा...: देवेंद्र फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news