Nagpur Municipal Election Result |भाजपचा जल्लोष गडकरींच्या महालातील वाड्यावर, फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती ठरणार खास

Nagpur Municipal Election Result |भाजपचा जल्लोष गडकरींच्या महालातील वाड्यावर, फडणवीस-चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती ठरणार खास
image of devendra fadanvis-nitin gadkari
Nagpur Municiple Election Result latest updates pudhari photo
Published on
Updated on
Summary

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. या विजयाच्या आनंदात गडकरींच्या महालातील वाड्यावर भव्य जल्लोष आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती ठरणार असून, भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Nagpur Municipal Election Result 2026

नागपूर - राजेंद्र उट्टलवार

चौथ्यांदा नागपूर महापालिकेत भाजप बहुमतासह सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने या विजयाचा जल्लोष उपराजधानीत मतमोजणी केंद्राबाहेर त्याचप्रमाणे प्रभागात ठिकठिकाणी सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर भाजपचा हा जल्लोष जाहीर स्वरूपात आज सायंकाळी साजरा केला जाणार आहे. मनपा निवडणूक प्रक्रियेत गडकरी यांचे महत्वाचे स्थान होते. एबी फॉर्म देखील त्यांच्याच कार्यालयातून वाटप झाले.

लोकसभा, विधानसभा पाठोपाठ हा आनंदोत्सव संघ मुख्यालय असलेल्या महाल येथेच होणार आहे हे विशेष स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी (एन्रीको हाईट्स, वर्धा रोड) येथे भेट देतील. त्यानंतर सगळे नेते एकत्रितपणे सोबत गडकरी वाडा ( महाल) येथे या विजयोत्सवात सहभागी होतील.

image of devendra fadanvis-nitin gadkari
Nagpur Municipal Election Result Live Updates : नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

दुपारी तीन पर्यंत चार सदस्यीय प्रभाग असल्याने निकाल फारसे जाहीर झालेले नसले तरी भाजप बहुमतासह पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले. या निकालात काही प्रभागात अनपेक्षित लढती पुढे आल्या. भाजपचे माजी आमदार डॉ मिलिंद माने यांच्या पत्नी तर विकास कुंभारे यांच्या मुलाला पराभूत व्हावे लागले. काँग्रेसने स्वबळावर लढत भाजपला थेट लढत दिली. शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेसची पिछाडी दिसली तर आप,एमआयएमने काही प्रभागात आश्चर्यकारकरित्या जोरदार मुसंडी मारली.

सायंकाळी पाचच्या सुमारास नागपुरात एकंदर 151 जागांपैकी भाजप 112, काँग्रेस 28,शिवसेना शिंदे गट 2, उबाठा शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा 1 आणि इतर 6 अशी आघाडी कायम होती. अनेक प्रभागात भाजप काँग्रेस काट्याची लढत सुरू असून सर्व निकाल हाती येण्यास किमान 7 वाजतील अशी स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news