

NMC Election results
नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शहरात झोन निहाय १० ठिकाणी होणार आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, अपक्ष असे एकंदर ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. मनपातर्फे प्रशासन सज्ज आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक मनपा मुख्यालय येथे सोमवारी (दि.५० पार पडली.
या बैठकीत मनपा उपायुक्त (निवडणूक) निर्भय जैन आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३००४ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.मतदान केंद्राची तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती देखील वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चाची माहिती झोन स्तरावर संकलन व तपासणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना खर्चाचे विविध नमुने , माहिती सादर करण्याची पद्धती याबाबत माहिती देण्यात आली आहे.विविध परवानगी साठी झोन स्तरावर आणि मुख्यालय येथे एक खिडकी व्यवस्था उभारण्यात आली आहे. झोन स्तरावर आचार संहिता कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर उपलब्ध राहणार आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता मनपातर्फे स्वीप उपक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
मनपा झोन आणि मतमोजणी ठिकाणाचे नाव
लक्ष्मीनगर झोन - गंगाधर फडणवीस क्रीडा संकुल, विवेकानंद नगर,
धरमपेठ झोन - सेंट फ्रान्सिस दि सेल्स ( एस.एफ.एस) कॉलेज, सेमिनरी हिल्स,
हनुमाननगर झोन -ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक,
धंतोली झोन - सामुदायिक भवन, रेल्वे विभाग, अजनी रोड, गुलमोहर कॉलनी, वंजारी नगर,
नेहरुनगर झोन - राजीव गांधी सभागृह, न्यू नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ,
गांधीबाग झोन - नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी सांस्कृतिक सभागृह, ग्रेट नाग रोड, गणेशनगर,
सतरंजीपुरा झोन - दि नागपूर टिम्बर मर्चंट असोसिएशन लकडगंज
लकडगंज झोन - विनायकराव देशमुख हायस्कूल आणि विज्ञान कनिष्ट महाविद्यालय ऐव्हीजी लेआऊट, लकडगंज,
आशीनगर झोन -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, ललित कला भवन, ठवरे कॉलनी
मंगळवारी झोन - अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालय (तिडके विद्यालय परिसर) काटोल रोड, छावणी