Nagpur Municipal Corporation | महापालिकेच्या मुख्यालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या; नागपूरच्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

 सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून चौकशीची मागणी
Nagpur Muncipal Election
Nagpur Muncipal corporation
Published on
Updated on

नागपूर : नागपूर महापालिकेच्या मुख्यालयाच्या सहाव्या मजल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काचेचे ग्लास आढळल्याचा दावा समोर आल्यानंतर शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या या शासकीय कार्यालयात असा प्रकार कसा घडला, याबाबत सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नागपूर महापालिकेचे मुख्यालय हे शहराच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जातात. अशा ठिकाणी सहाव्या मजल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काचेचे ग्लास आढळल्याचा दावा समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nagpur Muncipal Election
​Nagpur Crime | नागपुरातील चर्चित युवती आशी डेचा मृतदेह कान्हान नदीत आढळला; हत्या असल्याचा संशय!

महापालिका मुख्यालयात २४ तास सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. त्यामुळे संबंधित वस्तू इमारतीत कशा पोहोचल्या, त्या नेमक्या कोणी आणल्या, त्यांचा वापर कार्यालय परिसरातच झाला का आणि सुरक्षा यंत्रणेला याची माहिती होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

याशिवाय, सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेची नोंद झाली आहे का, सुरक्षा रक्षकांनी कोणती भूमिका बजावली आणि संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले का, याचाही तपास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाच्या मुख्यालयातच अशा प्रकारची घटना समोर आल्याने महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

अधिकृत भूमिका अद्याप नाही

या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही. चौकशीअंतीच या प्रकरणामागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news