Nagpur Municipal | नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभापतींनी सूत्रे स्वीकारली

Nagpur News | मनपाच्या पाच विशेष समिती सभापतींनी स्वीकारला पदभार
NMC Chairperson Appointment
NMC Chairperson Appointment Pudhari
Published on
Updated on

NMC Chairperson Appointment

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पाच विशेष समितींच्या नवनिर्वाचित सभापतींनी सोमवारी (दि. १६) सूत्रे स्वीकारली. महापालिका मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात महापौर निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर उपस्थित होते.

माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार प्रा.अनिल सोले, माजी आमदार विकास कुंभारे यांनी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कावरे, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

NMC Chairperson Appointment
Nagpur News: गणित चुकलं म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची क्रूर मारहाण; हात झाला फ्रॅक्चर; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

यावेळी परिवहन विभागाच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे, विधी विशेष समितीच्या सभापती कु. निधी नितीन तेलगोटे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे उपसभापती प्रदीप पोहाणे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती श्रीकांत आगलावे, विधी विशेष समितीचे उपसभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, शिक्षण विशेष समितीच्या उपसभापती भारती बुंदे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीचे उपसभापती संदीप गवई, क्रीडा विशेष समितीचे उपसभापती संजय चावरे, महिला व बालकल्याण विशेष समितीचे उपसभापती तारा (लक्ष्मी) यादव, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती विजय (पिंटू) झलके, कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे उपसभापती सुनिल हिरणवार, नगरसेवक रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह समिती सदस्य, इतर नगरसेवक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news