

Nagpur Municipal Election Preparation News
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : राज्यातील महापालिकांसाठी आता बरोबर महिनाभराने 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 रोजी मनपावर कुणाची सत्ता हे स्पष्ट होणार आहे. उपराजधानीत आजपासूनच भाजप नेते, स्थानिक आमदारांनी भाजप महायुतीची येणार सत्ता, मुहूर्त ठरला महापौर आणि गुलाल पक्का...! असे एफबी, स्टेट्स ठेवले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सोमवारी 15 डिसेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच नागपुरात प्रशासन कामाला लागले आहे. मनपाचे प्रशासक,आयुक्त अभिजीत चौधरी यांनी आढावा बैठक घेतली. पत्रकारांशी चर्चा केली. दीड दशक सत्ता असलेल्या भाजपने इच्छुकांच्या मुलाखती आजपासून शहर कार्यालयात विधानसभा मतदार संघनिहाय सुरू केल्या आहेत.
काँग्रेसने स्थानिक आमदार,निरीक्षकांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी मनपात परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता आहे. महायुतीत अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी लढून आघाडीची धर्मनिरपेक्ष मते विभाजित करू शकते. पर्यायाने फायदा महायुतीचा होईल. भाजपने विधानसभा क्षेत्रानुसार प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात पूर्व नागपूरसाठी प्रा अनिल सोले,पश्चिम नागपूरसाठी प्रा. राजेश बागडी, दक्षिण-पश्चिम साठी आमदार प्रवीण दटके, मध्य नागपूरसाठी माजी आमदार गिरीश व्यास, दक्षिण नागपूर साठी भोजराज डुंबे यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक संचालन समिती अध्यक्ष शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार 16 ते 18 डिसेंबर पासून श्रद्धा मंगलम भाजप कार्यालय गणेशपेठ येथे होतील.
9 ते 12 डिसेंबर दरम्यान इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार विधानसभा व प्रभाग नुसार मुलाखत होणार आहे,16 डिसेंबरला पूर्व व पश्चिम विधानसभा,17 डिसेंबर ला उत्तर व दक्षिण विधानसभा,18 डिसेंबरलाअर्ज सादर केलेल्या इच्छुक उमेदवारांना व्यक्तिशः पक्षातर्फे मुलाखतीसाठी निरोप दिला असल्याची दक्षिण-पश्चिम व मध्य विधानसभा,प्रभागनुसार सकाळी 9 पासून मुलाखती घेतल्या जातील, अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.